MARATHI LAGHUPAT SELECTS 2019

Competition Details

We are inviting Marathi Shortfilms shot in 2019.Top 5 selected films will be awarded from marathilaghupat.comRules.

- Submit your film before 31-12-2019
- Film should be only submitted through google drive.
- Promotional material, Casting and Synopsis should be shared along with film.
- Selected films will be announced on 15-01-2020
- Selected Films will be awarded with certificates and they will be featured on our website and other social media platforms.

Email: marathilaghupat@gmail.com

Baluta बलुतं – Award winning short film

स्त्रीमुक्ती या विषयावर आधारीत हा लघुपट आजच्या समाजाला खूप काही सांगून जातो.

नवीन दालन -’मराठी डॉक्युमेंटरी’ | New Section – Marathi Documentary

www.marathilaghupat.com वर लवकरच घेऊन येत आहोत एक नवीन दालन ‘मराठी डॉक्युमेंटरी’
मराठी भाषेतील विविध Documentary films प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.
तुम्ही तुमची फिल्म marathilaghupat@gmail.com वर पाठवू शकता.

मराठी लघुपट वेब प्रीमियर Marathi Laghupat Web premiere


“मराठी लघुपट वेब प्रीमियर”
सादर आहे तुमच्या हक्काचा पडदा

मराठी लघुपटांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक व्यासपीठ. अनेकदा तुम्ही तुमचे लघुपट ऑनलाईन टाकता परंतु त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळतोच असे नाही. तुमचे स्वतःचे फॉलोअर्स असतात पण तेही मोजकेच.

आम्ही marathilaghupat.com द्वारे मराठी लघुपट Web Premiere  ही संकल्पना घेऊन आलो आहोत.

तुम्ही तुमचा लघुपट पहिल्यांदा marathilaghupat.com व आमच्या फेसबुकवरून  जगासमोर सादर करू शकाल.

तुमचा लघुपट तुमच्या स्वतःच्या चॅनेल वर किंवा मराठी लघुपटच्या चॅनेल वरून प्रक्षेपित करु शकता.
आमच्याद्वारे आलेले प्रेक्षक सहज मोजता येतील. लघुपट अपलोड करण्यापूर्वी पोस्टर रिलीज, फर्स्ट लूक, टीजर व प्रोमोज देखील सादर करता येतील.

अधिक माहितीसाठी marathilaghupat@gmail.com वर संपर्क करा.

Miraj International Film Festival

मिरज येथे आंतरराष्ट्रीय लघुपट फेस्टिवल आयोजित होत आहे.


- या फेस्टिवलमध्ये लघुपट पाठिवण्याची अखेरची तारीख २० जानेवारी आहे.

- १ जानेवारी २०११ ते १ जानेवारी २०१७ या कालावधीतील ४० मिनिटापेक्षा कमी ड्युरेशनच्यालघुपटांना निमंत्रित करण्यात आले आहे. http://bit.ly/2iHUio1

- यामध्ये विविध विभागात १००० ते २१००० पर्यंतची पारितोषिके देण्यात येणार आहेत http://bit.ly/2hQRjd3

ववेबसाइट – http://misff.co.in
एन्ट्री फॉर्म – http://bit.ly/2j8Wgy5
फेसबुक पेज – http://bit.ly/2iP2QXk

 

 

 

 

 

 

 

If you are organising a Short film festival do let us know.We are happy to become online partner. Call 8600536756

 

कोल्हापूरची ‘चौकट’ गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार*

कोल्हापूरची ‘चौकट’ गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार*

कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारलेली ‘चौकट’ ही शॉर्टफिल्म गोवा येथे 20 ते29 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या 47 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI (इफ्फी)झळकणार आहे. ‘चौकट’फिल्मच्या ‘इफ्फी’तील निवडीमुळे कोल्हापूरची कलापूर ही ओळख पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी गोव्यात आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातल्या सिनेरसिकांसाठी पर्वणी समजला जातो. देश-विदेशातील आशयघन सिनेमे पाहायला मिळत असल्याने या महोत्सवाला सिनेसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटप्रेमी दरवर्षी मोठी गर्दी करत असतात. या महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारलेल्या ‘चौकट’ या लघुचित्रपटाची निवड झाली आहे.^

अ‍ॅडव्हेंचर्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि उमेश बगाडे लिखित व दिग्दर्शित ‘चौकट’ या लघुपटातून दगडाच्या मूर्तीत सर्वांना देव दिसतोच, तसा माणसातही माणूस दिसलाच पाहिजे हा संदेश देण्यात आला आहे. या शॉर्टफिल्मच्या कलात्मक व तांत्रिक बाजू कोल्हापूरच्याच कलाकार व तंत्रज्ञांनी सांभाळल्या आहेत.

उमेश बगाडे या कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाने यापूर्वी विविध जाहिरातपटांची निर्मिती केली असून, टीव्ही चॅनल्सवरील विविध मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्य केले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातील प्रा. विजय पवार, अभिनेत्री व नृत्यांगना कोमल आपके यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिषेक शेटे याने छायांकन केले असून, उत्कृष्ट छायांकनासाठी त्याला आत्तापर्यंत 4 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन,ऐश्‍वर्य मालगावे यांनी पार्श्‍वसंगीत, सागर ढेकणे व अभिषेक संत यांनी कला दिग्दर्शन, अमर कुलकर्णी याने रंगभूषा व वेशभूषा, जाई दिघे हिने उपशीर्षके अशा जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. तसेच संदीप गावडे,विजय कुलकर्णी, अक्षय क्षीरसागर, पुष्कराज ठक्कर,सुमित सासने यांचेही या फिल्मसाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

या शॉर्टफिल्मबद्दल अधिक माहिती देताना लेखक-दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी सांगितले, की छायांकन ही या शॉर्टफिल्मची जमेची बाजू आहे. अमराठी लोक जेव्हा ही फिल्म बघतात, तेव्हा उपशीर्षक न वाचताही या मराठी भाषिक चित्रपटाचा आशय त्यांना सहज उमगलतो. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्ममध्ये काम केलेले कलाकार आणि तांत्रिक बाजू सांभाळणार्‍या सर्व कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता काम केले आहे. या शॉर्टफिल्मची भारताच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाल्यामुळे आमची मान अभिमानाने उंचावली आहे.

*‘चौकट’ला अनेक पुरस्कार*

‘चौकट’ या मराठी शॉर्टफिल्मची या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. इटली येथील रिव्हर टू रिव्हर फ्लोरान्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल, 22वा कलकत्ता इंटर्नशनल फिल्म फेस्टिवल अशा मानाच्या फेस्टिव्हल्स मध्ये चौकट लवकरच झळकणार आहे… चेन्नई येथील चेनीम फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म,पॉकेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडिएन्स चॉईस बेस्ट फिल्म, हरियाना फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म,दिल्ली येथील वुडपीकर बेस्ट फिल्म आदी प्रतिष्ठेचे पुरस्कार या मराठमोळ्या फिल्मने पटकावले आहेत.

Indie Meme is inviting Marathi Shortfilms and Films for upcoming festival.

‘Indie Meme’ in Austin, TX is a city-funded, non-profit created with a vision to promote South Asian Independent Documentaries & Narratives as well as the filmmakers.
In a short time, they have screened many amazing films such as Ship of Theseus, Court, The Threshold, I AM, Katiyabaaz, Gulabi Gang, Brahmin Bulls, Kothanodi, Placebo & many more.
They just wrapped up their first and very successful IndieMeme Film Festival in April 2016 and are looking for more films to screen this year.
Currently, they are looking for more compelling films to add to lineup for IndieMeme Film festival in 2017!
They are inviting Marathi Shortfilms and Films to showcase in their upcoming 2017 festival.

Know More: http://www.indiememe.com/