मराठी लघुपट च्या छोट्याश्या जगात तुमचे स्वागत

मराठी लघुपट च्या छोट्याश्या जगात तुमचे स्वागत

या आपल्या लहानश्या जगाची तशी लोकांना फारशी माहीती नसते, कारण आपण मोठ्या सिनेमांसारखे सर्वत्र चमकत नसतो. तसे लाघुपटाचे हे विश्वाच खूप लहान आणी त्यात देखील मराठी लघुपट म्हणजे त्यातला एखादा लहानसा कण, परंतु आपले जग जरी चंदेरी दुनिये सारखे मोठे आणी प्रसीद्ध नसले तरी आपल्याकडे असलेली कल्पकता आणी ज्ञान हे पुढे जाउन चंदेरी दुनियेस काहीतरी नवीन नक्कीच देणार आहे. लघुपट म्हणजे सिनेविश्वात पदार्पण करनाऱ्यासाठी पहिली पायरी जाणली जाते मग ते कलाकार, दिग्दर्शक, लेखक आसोत किंवा आणी कोणी, सर्वांसाठी इथे चुकण्यास आणी चुकून पुन्हा शिकण्यास नक्कीच वाव मीळतो.
परंतु मित्रानो आपण करणारे लघुपट बऱ्याचदा फ़क्त फेस्टिवल्स पुरतेम मर्यादित रहातात. ते सामान्य लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात पोहचतात. तसे पाहता आपण हे लघुपट करण्यास खूप मेहनत पण घेतो परंतु तेवढे यश आपल्या पदरात पड़तेच असे नाही. अनेकदा लघुपट तर तयार आसतो परंतु तो कुठे प्रदर्शित करावा हा प्रश्न निर्माण होतो आणी परिणामी तो कुठेतरी विरून जातो. असे होऊ नये व सर्वाना योग्य दिशा मिळावी म्हणुनच ‘मराठी लघुपट डॉट कॉम’ ही साईट सुरु करीत आहोत, जेणेकरून येथे आपण लाघुपटासाठी वाहून घेतलेले सर्व एकत्र येउन आपल्या या लहानश्या विश्वास आजुन सुंदर कसे बनविता येइल यासाठी प्रयत्न करू..