सातारा शॉर्टफिल्म फेस्टिवल -२०१२ ला लाभला महाराष्ट्रातील फिल्म मेकर्स आणी रसिकांचा भरघोस प्रतिसाद.

‘नैतिक क्रिएटर्स’ या संस्थेने आयोजित केलेला

या फेस्टिवलला पहिल्याच वर्षी मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे या फेस्टिवलचे महत्व अधिकच वाढले आहे. भारतीय चित्रपटास १०० वर्ष झाल्याचे औचित्य साधून या फेस्टिवलची घोषणा केली आणी या हाकेस अखंड महाराष्ट्र ,महाराष्ट्राबाहेरून आणी विदेशातूनदेखील प्रचंड प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या या फेस्टिवल मध्ये सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, धुळे, उस्मानाबाद, लातूर आश्या अनेक ठिकाणांहून १९१ लघुपट सहभागी झाले, त्यापैकी परीक्षण करूण त्यामधून ४५ लघुपटांची परीक्षकांनी निवड केली.

दि. ७ ऑक्टोबर, २०१२ रोजी निवडलेल्या लघुपटांची यादी जाहीर केल्यानंतर आता वेळ आली आहे या सर्व फिल्म्स रसिकांसमोर घेऊन जाण्याची.

निवड झालेल्या सर्व फिल्म्स दि. ३ व ४ नोव्हेंबर , २०१२ रोजी साताऱ्यातील शाहूकला मंदिर येथे प्रेक्षकांस पहावयास मिळतील. महाराष्ट्रातील फिल्ममेकर्स,कलाकार व रसिक यांना साताऱ्यात एकत्र घेऊन येणारा हा फेस्टिवल एक विशेष आकर्षण बनला आहे.

फिल्म स्क्रीनिंग, प्रदर्शन तसेच लाइव्ह पर्फोमन्सेस ने नटलेला हा फेस्टिवल सतारकरांसाठी एक वेगळाच अनुभव असणार आहे. सहभागी झालेल्या मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषेतील या फिल्म्स १२ ते ७० या वयोगटातील फिल्ममेकर्सनी तयार केलेल्या आहेत.

विविध विषयावरील काल्पनिक तसेच माहितीपट घेऊन येणारा हा फेस्टिवल म्हणजे ‘नैतिक क्रिएटर्स’ नी साताऱ्यास दिलेली एक वेगळीच ओळख आहे.

कोणत्याही लघुपट प्रेमी रसिकांनी हा फेस्टिवल चुकुवू नये. या फेस्टिवल मध्ये आपली हजेरी लावायची असल्यास त्वरित www.ssff.com ला भेट द्या.

न झेपणारे लघुपट परिक्षण शुल्क अन्याकारकच.

बालचित्रवाणी ( राज्य तंत्रज्ञान संस्था ) या संस्थेने लघुपट परीक्षणाची शुल्क हि अचानक वीसपटीने वाढवली असल्याने

महाराष्ट्रातील  बोटावर मोजण्याइतके  असलेले लघुपट निर्माते हे अडचणीत आले.
शिक्षण संचालनालयात  एखादा लघुपट सादर करायचा असेल तर त्या लघुपटाचे परीक्षण हे  बालचित्रवाणी या संस्थेकडून करून घेणे बंधनकारक आहे.
या परीक्षांसाठीची  शुल्क  २ महिन्यापूर्वी पाच हजार रुपये एंक तासासाठी आणि त्यापेक्षा जास्त असेल तर दहा हजार ही होती त्यामध्ये अचानक वीस पटीने वाढ करून ती आता एंक तासासाठी  एंक लाख रुपये आशी केली आहे. लघुपट निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा परीक्षणासाठीची रक्कम कितीतरी अधिक आहे. एंक लघुपट जर पंचवीस हजार रुपयात तयार झाला तर त्याच्या परीक्षणासाठी कमीत कमी एंक लाख रुपये किव्हा त्यापेक्षाही  जास्ती रक्कम लागू  शकते. आशा प्रकारची दरवाढ करून लघुपट निर्मात्याचे कंबरडे मोडले आहे.