फॅंड्री

लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते लघुपट दिग्दर्शक नागराज यांचा ‘फॅंड्री’ हा नवीन चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे लेखन देखील नागराजनेच केले आहे.
लेखन आणि सिनेमाची आवड त्यांना एका लहान खेड्यातून थेट सातासमुद्रापार घेऊन गेली आहे. चित्रपट जगतात ‘फॅंड्री’ बद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.
वेगळ्या प्रकारच्या कथेवर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे असे दिग्गज बोलतात. रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये हा सिनेमा निवडला गेला आहे.
या चित्रपटाचे निर्माते आहेत निलेश नवलखा आणि विवेक कजरिया.