‘युनिव्हर्सल मराठी’ या संस्थेतर्फे ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन


‘युनिव्हर्सल मराठी’ या संस्थेतर्फे ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन
‘युनिव्हर्सल मराठी’ या संस्थेतर्फे ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मानवी जीवनाच्या छटा, छोटेछोटे प्रसंग, भावभावना, एखाद्या विषयावरील भाष्य किंवा संकल्पना जिवंतपणे मांडणार्‍या लघुपटांचा हा महोत्सव रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये भरविण्यात येणार आहे. सामाजिक जनजागृती, मोबाइल शूट फिल्म, दृश्य परिणाम म्हणजेच व्हीएफएक्स-अँनिमेशन, आंतरराष्ट्रीय लघुपट, जाहिरातपट अशा पाच गटांमध्ये प्रवेशिका असून तज्ज्ञ परीक्षक यातून विजेत्यांची निवड करतील.यानिमित्त नव्या निर्मात्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘धग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील तसेच ‘देवी’ या आगामी मराठी चित्रपटातील कलावंत पूर्वा पवार, उदय सबनीस, विलास उजवणे, अंजली उजवळे, बाळ धुरी व दिग्दर्शक दत्ता जमखंडे उपस्थित राहणार आहेत.

www.mymumbai2013.blogspot.com ह्या साईट वर तसेच 9833075706/9029333078/ 9768930853. ह्या क्रमांकावर संपर्क करावा.

MY MUMBAI SHORTFILM FESTIVAL 2013
mymumbai2013.blogspot.com

Online Partner: www.marathilaghupat.com