गल्ली…..

Vartul By Santosh Ram

Vartul Film Poster

“वर्तुळ “या माझ्या  लघुपटाने १३ पारितोषिके मिळवून  आणि ५४ अंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवात भाग घेऊन आमच्या प्रयत्नांच खरच वर्तुळ पूर्ण केल होत .वर्तुळ मुळे वयक्तिक जीवनात फार बदल झाले होते , पण आर्थिक बदल मात्र काहीच होत नव्हते  . मग काही वर्षे आर्थिक गणितांसाठी आटापिटा .. वेळ जात होता आणि पुर्ण लांबीचा चित्रपट बनवण्यासाठी  कोनीही  निर्माता पुढे येत   नव्हता . कुठलाही विचार न करता सतत प्रयत्न करत राहणे हाच एकमेव मार्ग होता त्याच बरोबर दर वर्षी एकतरी लघुपट करण्याचा आणि परत न फिरण्याचा  मी ठाम  निर्णय घेतला . एक लेखक  व  दिग्दर्शक म्हणून माझ्या अनुभवात  वाढ  आणि माझ्या क्षेत्रात   नवनवीन प्रयोग करण्यावर मी  भर दिला त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे ” गल्ली ”

खुप विषय सुचले आणि प्रत्येक वेळेला वाटल कि फिल्म करावी पण म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही . एक दिवस असच कोल्हापुरात भटकत असताना गल्लीची   कल्पना डोक्यात आली  आणि जवळ जवळ दोन वर्षे या विषयवार मी काम करत होतो .  कल्पना खरच भन्नाट होती पण १८ ते २०  मिनिटात एका गल्लीत  ७ दिवसात घडणाऱ्या सामाजिक घटना व त्याच बरोबर त्या गल्लीत राहणाऱ्या लोकांच्या घरात घडणाऱ्या घटना मला मांडायच्या होत्या . समकालीन किंवा आधुनिक जीवनात  एकत्र  कुटुंब पध्दती  जवळ जवळ संपलीच आहे आणि आजही काही भागात एक गाव किंवा एक गल्ली आपल्या परिसरालाच एक कुटुंब म्हणुन आधुनिक बदलाला सामोरे जाताना दिसतात  . विषय मोठा आणि मला भरपुर काही सांगायच होत मग मी नवीन नवीन चित्र रुपात  सांगण्याच्या  किंवा  दाखवण्याच्या पद्धती शोधु लागलो  . खुप  दिवसांपासून माझ्या डोक्यात एकही डायलॉग नसलेला लघुपट करण्याची कल्पना घर करत होती  पण ती इथे वापरता येत नव्हती . गल्लीतल्या गोष्टीचा व्याप मोठा आहे म्हणून थोडेसे   संवाद आणि थोडासा गल्लीतील  चौकातल्या फलकाचा  समर्पक वापर केला .

गल्लीत  घडणाऱ्या  सात दिवसांमधून  आपण जातो.प्रत्येक दिवसासाठी ‘एक’ सूचना वा माहिती गल्लीतल्या त्या फलकावर लिहिलेली आपण पाहतो. त्यानंतर त्याच दिवसातली गल्लीतील एखादया घरातील चार भिंतींच्या आड घडणारी घटनाही आपण पाहतो. म्हणजे जेंव्हा फलकावर ‘वाढदिवस’आहे,तेंव्हा तिकडे कुणीतरी नवीन नात्याची सुरुवात करतय;जेंव्हा फलकावर एका मुलीचे अभिनंदन आहे तेंव्हा तिकडे दुसरया मुलीची धडाडी आहे. एका वेळी फलकावर रात्रीचे भजनाचे आमंत्रण असते तेंव्हा छोट्या घरात एका म्हतारया आजोबांची जीवन जगण्याची इच्छाच संपली आहे  .जन्म ,आशा, निराशा,जिदद,वाढत्या वयानुसार बदललेली नाती, सर्वकाही गमावून बसलेल्यांची जगण्याची धडपड ,तसेच मृत्यु इत्यादी सर्व मानवी भावनांनि भरलेली हि गल्ली आहे ,जी इतर सर्व ठिकाणीही असते पण आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात त्यांच्याकडे नीटसे पाहू शकत नाही .

विवेक चित्र निर्मित  “गल्ली” चे छायाचित्रीकरण बेंजामिन बृगत्झ या बेल्जीयम येथील छायाचित्रकाराने केले असून  विवेकानंद डाखोरे यांनी  संकलन केले आहे  . प्रणव घोड नदिकर याचे संगीत आहे  तर समीर थोरात यांनी  ध्वनी मुद्रणाची  धुरा सांभाळलि आहे .  निर्माता रामचंद्र पुंडलिकराव मरेवांड  आणि कार्यकारी निर्माता म्हणुन बालाजी रामचंद्र मरेवाड  आहेत  .गल्ली  ह्या लघुपटाच्या माध्यमातून आता अस्तित्वात असल्रली व  पुढे हळु हळु  लुप्त पावत जाणारी  हि गल्ली हा मानवी वसाहतीचा प्रकार एका अर्थाने पुढील पिढ्यांच्या माहितीकरिता नमूद झाला आहे .  गल्ली आज  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी तयार आहे  आणि मला  खात्री आहे कि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गल्ली नक्कीच आपला ठसा उमटवेल .

(लेखक ‘वर्तुळ ‘आणि ‘गल्ली ‘या लघुपटांचे  दिग्दर्शक आहेत )

www.marathilaghupat.com