लघुपट तयार करण्याआधी हे करा.

तुम्ही यापूर्वी लघुपट बनवला नसल्यास खालील गोष्टी करा.
तुम्हाला अनेक अनुभव मिळतील व लघुपट बनविणे सोपे जाईल.

१. तुमची कथा एक किंवा दोन पानांवर लिहून काढा.
२. तुमच्या मित्रांना साहभागी करून वेग-वेगळी कामे वाटून घ्या.
३. मोबाइलवर किंवा कोणाकाडून कॅमेरा घेऊन त्यावर शूट करा.
४. तुमच्या जवळील कंप्युटर वर साध्य एडिटिंग सॉफ्टवेअर वर एडिट करा.
५. तयार झालेला विडिओ Youtube, Vimeo अश्या साईट्स वर टाका व दर्शकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या व त्यातून शिका.असे लघुपट करीत राहा जोपर्यंत तुम्हाला फिल्म बनविण्याचा आत्मविश्वास येत नाही.
६. स्वतःला या क्षेत्रात जास्ती जास्त झोकून द्या आणि परफेक्ट फिल्म बनवा.

फक्त स्त्री ला ‘दुर्गा’ बनून चालणार नाही पुरुषांना देखील ‘शिवबा’ बनायला हवे.

महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे सारा देश पुन्हा बलात्कार या विषयावर जागा झाला आहे. पण नेमके असे काय घडलकीच जागे झाले पाहिजे का? अश्या घटना घडल्यानंतर जे आवाज उठवले जातात ते आधी का बंद असतात? कोणी एक जण या विषयावर तोडगा काढू शकत नाही. सर्व महाराष्ट्राने निर्धार करायला हवा की माझ्या घरातील, शेजारातील, गावातील आणि परिणामी महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षित असलीच पाहिजे.

 

माझ्या सभोवताली काही संशयास्पद जाणवत असेल तर त्याकडे  लक्ष हे माझे कर्तव्य आहे. सडकछाप,मवाली व गावगुंड यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच मुलींना कोणी त्रास देत असेल तर वेळीच त्यावर उपाय काढणे अश्या गोष्टी आपणही करू शकतो. या गोष्टी अनेकदा आपल्याला जाणवतात पण आपण दुर्लक्ष करतो आणी त्यामुळेच अश्या घटना घडण्यास वाव मिळतो आणी, आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या वृत्तीचे लोक अतिशय खालच्या पातळीला पोचतात, वेळ आली आहे या सर्वाचा माज उतरविण्याची. फक्त स्त्री ला दुर्गा बनून चालणार नाही पुरुषांना देखील शिवबा बनायला हवे.

- www.marathilaghupat.com

मती

एक अशी वेळ,ज्या वेळेवर माणसाचं काहीचं नियंत्रण नसतं.शरीर,मेंदू आणि मन हे आपापल्या कक्षा सोडून वागत असतात.अश्याच विशिष्ट अवस्थेत सापडलेली ही……..मती..!