Articles

माझ्याकडे स्टोरी आहे.

सकाळी सकाळी फोने वाजतो तिकडून आवाज येतो
‘सर मला तुमचा नंबर माझ्या मित्राकडून मिळाला.
माझ्याकडे एक मस्त स्टोरी आहे मला लघुपट करायचा आहे’
कुठल्या तरी लहान गावातून आलेला फोन संभ्रमात पाडतो.  आज काल अनेकांना लघुपट बनवावासा वाटतो. पण वाटण्यात आणी चांगला लघुपट करण्यात खूप अंतर आहे. कोणाकडे कथा असते, कोणाला Acting  करायची असते, तर कोणाला दिग्दर्शक बनायचे असते.आज सिनेमा अगदी खेडो-पाड्यात पोहचला आहे लोकांना करमणूकी पलीकडे सिनेमा समजू लागला आहे. अश्यातच तळा गाळातून सिनेमा बनवणारे वर येत आहेत व वेगळे विषात हाताळत आहेत. रटाळ विषयांना कंटाळलेले प्रेक्षक त्यास दाद देत आहेत. एकूणच काय या क्षेत्रात क्रांती घडत आहे. या क्रांतीमुळे अनेकांना असे वाटू लागले आहे की लघुपट किंवा चित्रपट करणे सोपे आहे. एखादा लघुपट करायचा तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पाठवायचा आणी झालोच आपण प्रसिद्ध. हे एवढे सोपे आहे का?
तुमच्याकडे चांगली कथा आहे हे मान्य, कारण विचार करणे व लिहिणे ही कोण एकाची मक्तेदारी नाही. उलट तेच ते लिहीणाऱ्या लेखकांपेक्षा नवीन लेखकांकडे वेगळे विषय असू शकतात. तरी देखील अगदी थोड्या थोडक्या तयारीत लघुपट किंवा चित्रपट होऊ शकत नाही. तुम्ही लिहिलेली कथा खरच वेगळी आहे का? की नुकत्याच येऊन गेलेल्या एखाद्या चित्रपटाने प्रभावित झालेली आहे? किंवा सामाजिक विषयांवर आधारित आहे? किंवा अजून काही? कुठल्याही लघुपटाचा आत्मा ही त्याची कथा असते आणी म्हणूनच कथेवर जास्तीत जास्त अभ्यास होणे गरजेचे असते. उगाचच लघुपट करायचा म्हणून कशी बशी आवरलेले कथा नसावी. कथा पुन्हा पुन्हा पडताळुन पाहावी आणि मगच पुढचे पाऊल उचलावे.दिग्दर्शक  म्हणजे नक्की काय?  वेगळे प्रसंग चित्रित करून एकत्र जोडले की झाला लघुपट असा समाज असणारे लोक म्हणजे दिग्दर्शक न्हवेत. अनेक गोष्टीचा मेळ घालून एक उत्तम लघुपट मांडण्यासाठी अभ्यासू दिग्दर्शक असणे गरजेचे असते. मित्राचा कॅमेरा आहे म्हणून लघुपट करणारे दिग्दर्शक फक्त  Youtube वर आणखी एका व्हिडिओची भर घालतात ज्याचे जास्तीतीत  जास्त ४०० ते १००० views  असतात. उगाचच मित्रांचे किंवा घरातील कोणाचे तरी पैसे घेऊन त्याला प्रोड्युसर बनवण्याचे आमिष दाखवून बनणारे दिग्दर्शक तर आज काल  डझनावारी मिळतात. आज ना उद्या मी मोठा होईन या अपेक्षेत मिळेल त्या विषयावर लघुपट किंवा एखादे प्रेमगीत ज्याच्यात तेच ते बुळबुळीत बोथट चित्रीकरण व एखादा रोमान्स टाकायचा आणि स्वतःला दिग्दर्शक बोलवून घायचे. अश्या दिग्दर्शकांपासून सावध रहा. प्रोड्युसर बनण्याच्या नादात कोणावर पैसा लावताय ये तपासून पहा.
लघुपट बनविताना योग्य साधनांचा वापर करा. पूर्ण सिनेमा उभा करायचा आणी चित्रीकरणाचा संवादाचा, संगीताचा दर्जा दुर्लक्षित करायचा. याने कदाचित चांगला विषय देखील मार खाऊन जातो. सध्या नवीन तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या झाल्यात आहेत त्याचा योग्य वापर केला पाहिजे. ज्यांना शूटिंग, रेकॉर्डिंग, आर्ट, एडिटिंग इ. चे योग्य ज्ञान आहे असे लोक टीम मध्ये असणे गरजेचे आहे. अनेकदा शूट होऊन गेले आणि काही चुकीले तर पुन्हा सुधारता येत नाही आणी जे आहे त्याला घेऊन फिल्म तयार केली जाते. अश्या तडजोडीने फिल्मचा दर्जा घसरतो व ती स्पर्धेतून बाहेर पडते.
या क्षेत्रात तुम्हाला फिल्म बनवून देणारे खूप भेटतील पण फिल्म समजावणारे कमी. तुमचे पाऊल जपून टाका.
एकदा फसलात तर या क्षेत्रापासून कायमचे दुरावले जाल.style="display:block"
data-ad-client="ca-pub-4043805753150304"
data-ad-slot="9104301394"
data-ad-format="auto">

________________________________________________________________________________________________________________________

 

13th Pune International Film Festival-2015 Marathi competition winners.

 • Government of Maharashtra “Sant Tukaram” Best International Marathi Film award has been shared between
  Elizabeth Ekadashi directed by Paresh Mokashi & produced by Nittin Keni, Nikhil Sane & Madhugandha Kulkarni
  And
  Killa (The Fort) directed by Avinash Arun & produced by Ajay G Rai, Alan McAlex, Madhukar R Musle
  A cash prize of Rs. 5, 00 ,000/ - (Rs. Five Lakhs) is shared equally by the Producers of Elizabeth Ekadashi & Killa (The Fort) and the Directors of Elizabeth Ekadashi & Killa (The Fort) of the film.
 • Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Film Director award is given to Bhaurao Karhade, the director of the film Khwada Obstacle ) and a cash prize of Rs. 25,000/- is given to the director. A cash prize of Rs. 25,000/- is given to the film director.
 • Akhil Bhartiya Marathi Chitrapat Maha Mandal Best Marathi Film Actor award goes to the actor Ms.Ushai Naik for her performance in the film Ek Hazarachi Note (1000 Rupee Note). A cash prize of Rs. 25,000/- is given to the Actress.
 • PIFF-2015 Audience Award for Best Marathi Competition Film
  Film:    Salute| Salaam: Producer: Dr.Gaurav Somani, Sunil Somani, Anand Somani
  Director :  Kiran Yadnyopavit MTDC Short Film Competition
 • Akhil Bhartiy Marathi Chitrapat Mahamandal Best Marathi Film Screenplay Award - Mr. Shrikant Bojewar for the film Ek Hazarachi Note – cash prize of Rs. 25,000/-.
 • Akhil Bhartiy Marathi Chitrapat Mahamandal Best Marathi Film Cinematographer Award - Mr. Amol Gole for the Film Elizabeth Ekadashi – cash prize of Rs. 25,000/-.

________________________________________________________________________________________________________________________

 

लघुपट करताय ? हे नक्की वाचा!

कथेची निवड 
- लक्षात घ्या हा लघुपट आहे, कथा खुप सोपी असावी.
- तुम्ही स्वतः अनुभवलेली किंवा तुम्ही ज्या कथेस पक्का न्याय  देऊ शकाल  अशीच असावी.
- सर्वात आधी तुमची स्क्रिप्ट उत्तम झाली पहिजे। जास्तीत जास्त वेळ देऊन पुन्हा पुन्हा पड़ताळनी करुनच पुढील निर्णय घ्या.
- कथा ही तुमच्या प्रेक्षकास पटेल अशी असावी.
- इतर झालेल्या चित्रपटांच्या कथांच्या आहारी जाऊन व त्यांचे अनुकरण करू नका.
- तुमची कथा कोणत्या शैलीतील आहे हे जाणून पूर्ण लघुपटात त्या शैलीचा वापर एकसमान ठेवा, त्याने लघुपट आणखी प्रभावी होतो.

क्रमशः


style="display:block"
data-ad-client="ca-pub-4043805753150304"
data-ad-slot="9104301394"
data-ad-format="auto">


____________________________________________________________

 

गिरणी

जुन्या चाळीची साक्ष देणारी चौकट , अरुंद बोळाला आणखी अरुंद करण्यासाठी लावलेल्या सायकल आणि स्कूटर , चाळीचे जुनाट लाकडी बांधकाम प्रथमदर्शनी दिसूच नयेत म्हणून त्यावर वाळत घातलेले लाकडाच्या तुलनेत नवे कपडे , आताच्या घरकुलात क्वचितच सापडणारे प्रशस्त अंगण , या सर्वाना सामाऊन घेत लाकडी जिन्यावरून आवाज न करता वर सरकणारा कॅमेरा …..मुलांच्या गलक्यातसुद्धा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि कथेतील नायकाच्या विश्वाची ओळख करून देण्यासाठी  “कर्र कर्र ” आवाज करत उघडणारा दरवाजा … पतीनिधनाच्या आघाताला मागे सारून पक्षाघाताने आजारी असलेल्या सासऱ्याला औषध देणारी नायकाची आई आणि नायकाचे हे विश्व बदलून टाकण्यासाठी येणार असलेली ….. ” गिरणी ”

                उमेश कुलकर्णी यांनी त्यांच्या “गिरणी ” या लघुपटात एका यंत्रामुळे किंवा मानवाच्या यांत्रिकीकारणामुळे एका लहान मुलाच्या विचारांवर -मानसिकतेवर आणि भाव विश्वावर किती सखोल परिणाम होतो याचे अत्यंत प्रभावीपणे चित्रण केले आहे …. …..संवादांपेक्षा कथेतील बाल नायकाच्या हाव भावाकडे अधिक लक्ष दिल्याने ती कथा मनास अधिकच भिडते …वडिलांच्या निधना नंतर घरातील चरितार्थासाठी गिरणी आणायचा निर्णय त्याची आई -मामा घेत असताना त्याच्या चेहेऱ्यावर उमटलेले अजाणतेपणाचे भाव , गिरणी आणायच्या आदल्या दिवशी रात्र जागून काढतानाचे उत्सुकतेचे भाव , गिरणी घरी आणतानाचे आनंदाचे भाव , गिरणी जिन्यातून वर घेऊन जात असताना त्याच्याच मित्राने हात लावल्यावर ” ए हात लाऊ नको आमची गिरणी आहे ” म्हणताना उमटलेले संरक्षणात्मक भाव , ” काकू पेढा घ्या ….आमच्या घरी गिरणी आणली आहे आता दळण आमच्या कडे द्यायचे ” अशी मौखिक प्रसिद्धी करतानाचे प्रसंग ,इतर मुले खेळत आहेत आणि आपण दळत आहोत याची जाणीव झाल्यावरचे उदास भाव , स्वप्नात अंगावर पीठ पडत आहे / गिरणी तोडताना चेहेऱ्यावर /अविर्भावातून व्यक्त केलेल्या रागीट भावना या सर्व मानवी छातंचे प्रभावी चित्रण दिग्दर्शकाने केले आहे …
                  हा लघुपट आहे एका मुलाचा आणि त्याचे विश्व बदलणाऱ्या गिरणीचा …अनेकदा आर्थिक विवंचनेमुळे लहान मुलांना आपल्या बालपणात प्रौढासारखे वागावे लागते पण प्रौढ असणे आणि तसे वागणे यात किती अंतर असते ते हा लघुपट स्पष्ट करतो … आपल्याला काम करायचे आहे आणि गिरणीचे हप्ते फेडायचे आहेत म्हणून खेळ /अभ्यास /शाळा सोडून झपाट्याने काम करणारा समीर ( बाल नायक) आणि हप्ता संपला म्हणून आई समाधानाने घरी परत येत असताना तीच गिरणी तोडून भिंतीशी अपराधी भावनेने उभा असलेला समीर पाहिल्यावर  मनात प्रश्न उपस्थित होतो की नक्की अपराधी कोण ?? बालपणी त्यास पितृवियोगाचे दुक्ख देणारी नियती ? परिस्थिती पुढे हतबल झालेली त्याची आई ? गिरणीची संकल्पना मांडणारा त्याचा मामा (गिरीश कुलकर्णी ) ? गिरणीत गुंतलेला समीर  ? त्याच्या दप्तरातून पीठ पडले म्हणून चिडवणारी- गिरणी चालवतो म्हणून त्यास “शेठ ” म्हणून चिडवणारी मुले ? लहानपणाची जाणीव झाल्यावर लहानासारखे वागता यावे म्हणून दळणाचे डबे सांडणारा , मोठ्याने पाढे म्हणणारा आणि अंती रागाने घरी येऊन त्याच्या bat ने तोडफोड करून संपूर्ण ,ताकदीने कधीकाळी त्याचे विश्व असलेली गिरणी खिडकीतून लोटून देणारा समीर ? त्यास तसे करण्यास थांबवायचा असमर्थ प्रयत्न करणारे पक्षाघाती आजोबा (चंद्रकांत गोखले ) की आपल्या आवाजाने समीर ला बाकीचे सर्व आवाज विसरायला लावणारी , आपल्या जात्यासारखे समीर ला गोल गोल फिरत आहोत किंवा त्याच्या अंगावर पिठाचा पाऊस पडत आहे अशी स्वप्ने दाखवणारी …….. ” गिरणी ” ….. ??
                    अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण करून हा लघुपट संपतो …. दिवे जाऊन पुन्हा लागायच्या दरम्यानच्या अंधकारात डोळ्यासमोरून हॉटेल /चहा च्या टपरीवर काम करणारा असाच एक समीर , सिग्नल वर पैसे द्या म्हणून येणारा समीर , ढोलाच्या तालावर दोरीवरून कसरती करणारा समीर , बूट पोलिश करणारा समीर , दुध /पेपर टाकणारा समीर आणि आतापर्यंत भेटलेले अनेक समीर डोळ्यासमोरून झर झर सरकू लागतात आणि मन त्यांच्या भावविश्वाचा अंदाज घ्यायचा अयशस्वी प्रयत्न करू लागते … लहान सहन गोष्टी एखाद्याच्या आयुष्यावर इतका खोलवर परिणाम करू शकतात हे वास्तव अस्वस्थ करते …कथेतील नायक त्याच्या खोलीतून गिरणी खाली टाकून अपराधी भावनेने हप्ते संपल्याच्या आनंदाने घरी येत असलेल्या आईच्या प्रतीक्षेत थांबतो पण खिडकीतून खाली पडलेली गिरणी आपल्या विचारचक्राला नवी गती देते आणि सुरु होते गिरणी ….विचारांची आणि बदललेल्या मानसिकतेची
-

- वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे

http://spaandaan.blogspot.in/style="display:block"
data-ad-client="ca-pub-4043805753150304"
data-ad-slot="9104301394"
data-ad-format="auto">