News

दारवठा

दारवठा लाघुपट International Film Festival of South Asia – Toronto IFFSA Toronto मध्ये निवडली गेली आहे. निशांत रॉय बोंबार्डे यांचा हा लघुपट ६३ व्या National Films Awards मध्ये Best debut film of director हा गौरव मिळवला आहे.

आपल्या पहिल्याच प्रयत्नात अगदी वेगळा विषय हाताळण्याचे यशस्वी धाडस निशांत रॉय बोंबार्डे यांनी केले आहे. दारवठाच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.

#IIFSA #Daaravtha #NationalAwardWinner #MarathiLaghupat

 

संतोष रामदिग्दर्शित “चायना मोबाईल″ चित्रपटाची घोषणा !

२० जानेवारीपासून चित्रपटाचे शुटींग सुरु

पुणे : ‘वर्तुळ’ आणि ‘गल्ली’ या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी आपल्या टीमसह पहिला चित्रपट “चायना मोबाईल″ ची निर्मिती व दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निवडक कलाकारांसह चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.


चायना मोबाईल या चित्रपटाद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या जीवनविश्वाचे दर्शन, तसेच आजच्या मराठवाड्यातील जीवनवास्तव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे, असे निर्माते – युवा दिग्दर्शक संतोष राम यांनी सांगितले. संतोष राम यांचा फिचर फिल्म प्रकारातील “चायना मोबाईल″ हा पहिलाच चित्रपट असून यापूर्वी वर्तुळ हा त्यांचा लघुपट ५४ राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये निवडण्यात आला आणि १४ पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. संतोष राम यांची निर्मिती दिग्दर्शन असलेला गल्ली हा लघुपट आता अनेक चित्रपट महोत्सवातून आपल्या समोर येत आहे.

“चित्रपटाची पटकथा ही प्रेम, राजकारण आणि मैत्री या मानवी भाव – भावनांभोवती विणलेली आहे, तरी हा चित्रपट जागतिक जीवनमूल्यांचा आत्मा असलेला विषय सर्वांसमोर घेऊन येत आहे,” असेही ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्रपटाचे शुटींग २० जानेवारीपासून सुरु होत असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये “चायना मोबाईल″ घेऊन जाण्याचा संतोष राम यांचा मानस आहे.

संतोष राम यांनी इंग्रजी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण मॉडर्न कॉलेज, पुणे येथे घेतले आहे. महानगरीय जीवनांतील विविध पैलूंचा व सिनेमाचा अभ्यास त्यांनी मैक्सम्युलर भवन, मुंबई येथे केला. फिल्म एंड टेलिव्हिजन इंस्टीट्युट, पुणे येथे त्यांनी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तेनाई इको फिल्म फेस्टिवल, गोवा या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवाच्या क्रिएटीव्ह बोर्डाचे सल्लागार आहेत आणि त्रिचूर येथे होणाऱ्या ११ व्या व्हीबग्योर लघुपट महोत्सवासाठी ते महाराष्ट्र प्रदेशचे निवड समिती सदस्य आहेत.

चायना मोबाईलचित्रपटाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क:

Facebook: www.facebook.com/chinamobilethefilm/

www.marathilaghupat.com is official web partner for ‘China Mobile’ 

 

 

 

————————————————————————————————-

Filmvention, marathi, shortfilm, laghupat,

Shortfilm Competition by Filmvention.

————————————————————————————————www.marathilaghupat.com is now online partner for ‘My Mumbai Shortfilm Festival 2013,

27-09-2013

चित्रपट सृष्टीत येवू पाहणारया नवीन पिढीसाठी लघुपट निर्मिती हे समर्पक शस्त्र  बनले आहे. आपल्या अवतीभवती घडत असलेल्या गोष्टींविषयी अभिव्यक्त होण्याची मानसिकता सगळ्यांच्या ठायी दिसून येते. कुणी लेखनातून, कुणी काव्यातून तर कुणी इतरही अनेक मार्गानी अभिव्यक्त होत असतात. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचा सर्जनशीलतेने वेध घेण्याचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे लघुपट. आतापर्यंत अनेक विषयांवर असे लघुपट तयार झालेले आहेत, नव्याने होत आहेत. महाराष्ट्रात लघुपट निर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक चांगले दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ समोर येत आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे व त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लघुपटामध्ये करिअर करणाऱ्या उमलत्या दिग्दर्शकांसाठी ते चांगली सुरुवात ठरू शकतात. लघुपट क्षेत्रामध्ये नवनवीन सुधारणा, प्रयोग करण्याला भरपूर वाव असल्याने आणि त्याद्वारे उत्तमोत्तम अनुभव मिळत असल्याने तरुणांना या क्षेत्राचे आकर्षण आहे.

लघुपटांच्या सृष्टीत नवे चैतन्य आणण्याचा ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचा (३ ऑक्टोबर २०१३) हा प्रयत्न सफल ठरो हि सदिच्छा !!style="display:inline-block;width:468px;height:15px"
data-ad-client="ca-pub-4043805753150304"
data-ad-slot="7879165949">

————————————————————————————————-
सतारा लघुपट मोह्त्सवात निवडलेल्या फिल्म्स ची घोषणा.  मीडिया पार्टनर म्हणून ‘झी २४  तास’ या वहिनीची साथ लाभली
8-10-2012
सतारमध्ये प्रथमच होणाऱ्या लघुपट मोह्त्सवात सहभागी झालेल्या अनेक फिल्म्स मधून स्क्रीनिंग साठी निवडलेल्या फिल्म्स ची घोषणा http://www.ssff.in  वर जहीर करण्यात आली आहे तसेच या मोह्त्सवास मीडिया पार्टनर म्हणून ‘झी २४  तास’ या वहिनीची साथ लाभली आहे.
——————————————————————————————————————-
सतारा लघुपट मोह्त्सव
5-10-2012
सतारमध्ये प्रथमच होणाऱ्या लघुपट मोह्त्सवात सहभागी झालेल्या अनेक फिल्म्स मधून प्रि-सिलेक्षण ज्यूरींनी निवडलेल्या फिल्म्सची घोषणा येत्या७ ओक्टोबर, २०१२ ला करण्यात येत आहे. कमी वेळात भरगोस प्रतिसाद लाभलेल्या या मोह्त्सवात राज्यातून तसेच बाहेरून अनेक उत्तम फिल्म्स सहभागी झाल्या आहेत. दिनांक ३ व ४ नोव्हेंबर ला साताऱ्यातील ‘शाहूकला मंदिर’ येथे लाघुपट दाखवन्यात येणार आहेत. या कार्यक्रमात फिल्म स्क्रीनिंग सोबत प्रदर्शन व आकर्षक लाइव परफॉर्मन्स देखिल पहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाची टिकिटविक्री सुरु झाली असून ९८२२०५४२५१ किंवा ९८८१९०४६९० या दूरध्वनी वर संपर्क साधून आपले डेलीगेट पासेस बुक करता येतील.