Baluta बलुतं – Award winning short film

स्त्रीमुक्ती या विषयावर आधारीत हा लघुपट आजच्या समाजाला खूप काही सांगून जातो.

फक्त स्त्री ला ‘दुर्गा’ बनून चालणार नाही पुरुषांना देखील ‘शिवबा’ बनायला हवे.

महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे सारा देश पुन्हा बलात्कार या विषयावर जागा झाला आहे. पण नेमके असे काय घडलकीच जागे झाले पाहिजे का? अश्या घटना घडल्यानंतर जे आवाज उठवले जातात ते आधी का बंद असतात? कोणी एक जण या विषयावर तोडगा काढू शकत नाही. सर्व महाराष्ट्राने निर्धार करायला हवा की माझ्या घरातील, शेजारातील, गावातील आणि परिणामी महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षित असलीच पाहिजे.

 

माझ्या सभोवताली काही संशयास्पद जाणवत असेल तर त्याकडे  लक्ष हे माझे कर्तव्य आहे. सडकछाप,मवाली व गावगुंड यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच मुलींना कोणी त्रास देत असेल तर वेळीच त्यावर उपाय काढणे अश्या गोष्टी आपणही करू शकतो. या गोष्टी अनेकदा आपल्याला जाणवतात पण आपण दुर्लक्ष करतो आणी त्यामुळेच अश्या घटना घडण्यास वाव मिळतो आणी, आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या वृत्तीचे लोक अतिशय खालच्या पातळीला पोचतात, वेळ आली आहे या सर्वाचा माज उतरविण्याची. फक्त स्त्री ला दुर्गा बनून चालणार नाही पुरुषांना देखील शिवबा बनायला हवे.

- www.marathilaghupat.com