लघुपट तयार करण्याआधी हे करा.

तुम्ही यापूर्वी लघुपट बनवला नसल्यास खालील गोष्टी करा.
तुम्हाला अनेक अनुभव मिळतील व लघुपट बनविणे सोपे जाईल.

१. तुमची कथा एक किंवा दोन पानांवर लिहून काढा.
२. तुमच्या मित्रांना साहभागी करून वेग-वेगळी कामे वाटून घ्या.
३. मोबाइलवर किंवा कोणाकाडून कॅमेरा घेऊन त्यावर शूट करा.
४. तुमच्या जवळील कंप्युटर वर साध्य एडिटिंग सॉफ्टवेअर वर एडिट करा.
५. तयार झालेला विडिओ Youtube, Vimeo अश्या साईट्स वर टाका व दर्शकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या व त्यातून शिका.असे लघुपट करीत राहा जोपर्यंत तुम्हाला फिल्म बनविण्याचा आत्मविश्वास येत नाही.
६. स्वतःला या क्षेत्रात जास्ती जास्त झोकून द्या आणि परफेक्ट फिल्म बनवा.

फक्त स्त्री ला ‘दुर्गा’ बनून चालणार नाही पुरुषांना देखील ‘शिवबा’ बनायला हवे.

महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे सारा देश पुन्हा बलात्कार या विषयावर जागा झाला आहे. पण नेमके असे काय घडलकीच जागे झाले पाहिजे का? अश्या घटना घडल्यानंतर जे आवाज उठवले जातात ते आधी का बंद असतात? कोणी एक जण या विषयावर तोडगा काढू शकत नाही. सर्व महाराष्ट्राने निर्धार करायला हवा की माझ्या घरातील, शेजारातील, गावातील आणि परिणामी महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षित असलीच पाहिजे.

 

माझ्या सभोवताली काही संशयास्पद जाणवत असेल तर त्याकडे  लक्ष हे माझे कर्तव्य आहे. सडकछाप,मवाली व गावगुंड यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच मुलींना कोणी त्रास देत असेल तर वेळीच त्यावर उपाय काढणे अश्या गोष्टी आपणही करू शकतो. या गोष्टी अनेकदा आपल्याला जाणवतात पण आपण दुर्लक्ष करतो आणी त्यामुळेच अश्या घटना घडण्यास वाव मिळतो आणी, आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या वृत्तीचे लोक अतिशय खालच्या पातळीला पोचतात, वेळ आली आहे या सर्वाचा माज उतरविण्याची. फक्त स्त्री ला दुर्गा बनून चालणार नाही पुरुषांना देखील शिवबा बनायला हवे.

- www.marathilaghupat.com

मती

एक अशी वेळ,ज्या वेळेवर माणसाचं काहीचं नियंत्रण नसतं.शरीर,मेंदू आणि मन हे आपापल्या कक्षा सोडून वागत असतात.अश्याच विशिष्ट अवस्थेत सापडलेली ही……..मती..!

माझ्याकडे स्टोरी आहे.

माझ्याकडे स्टोरी आहे.

सकाळी सकाळी फोने वाजतो तिकडून आवाज येतो
‘सर मला तुमचा नंबर माझ्या मित्राकडून मिळाला.
माझ्याकडे एक मस्त स्टोरी आहे मला लघुपट करायचा आहे’

कुठल्या तरी लहान गावातून आलेला फोन संभ्रमात पाडतो..

पुढे वाचा . .

 

विवेक राष्ट्रीय लघुपट मोहत्सव

विवेक राष्ट्रीय लघुपट मोहत्सव

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीआटपाट यांनी एकत्रितविवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ घोषणा केली असून यासाठी  अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर १५ मिनिट कालावधीचे  लघुपट, माहितीपट,  ऍनिमेशन लघुपट स्वीकारले जातील.

लघुपट स्वीकारण्याची अखेरची तारीख ५ ऑगस्ट राहील.

लघुपट जमा करण्याचा पत्ता:
साधना साप्ताहिक ४३१, शनिवार पेठ, पुणे – ४११०३०.

संपर्क : ९८८१६९१६५१ / ९४२२३०५९२९

अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट यांनी एकत्रित 'विवेक राष्ट्रीय लघुपट मोहत्सव' घोषणा केली

विवेक राष्ट्रीय लघुपट मोहत्सव

करा तुमच्या लघुपटाचे प्रमोशन आमच्यासोबत.

तुम्ही जर मराठी लघुपट करत असाल किंवा केला असेल तर तो  www.marathilaghupat.com या वेबसाईट वर प्रमोट करू शकता. तुमच्या लघुपटाचे ट्रेलर, प्रोमो, जिंकलेले अवार्ड्स, क्रेडिट्स, छायाचित्रे व सोबत फिल्म विषयी थोडक्यात माहिती पाठवू शकता. आम्ही हे सर्व आमच्या www.marathilaghupat.com या वेबसाईटवर बिनाशुल्क प्रकाशित करू.तसेच तुम्ही तुमचा पूर्ण लघुपट देखील या वेबसाईटवर प्रदर्शित करु शकता. तुमचा लघुपट जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचवण्याचा  प्रयत्न केला जाईल.
Send your details on marathilaghupat@gmail.com

India Mobile Film Festival (IMFF)

India Mobile Film Festival (IMFF) the largest showcase of Mobile Short Films is conceptualized by Talenthouse India in association with Royal Stag Barrel Select Large Short Films.
In an era where artistic expressions have no barriers, Large Short Films is inviting aspiring filmmakers to create inspiring work by simply using your mobile

If you are a storyteller and have a strong instinct to create films just pick your smartphone and start shooting and showcase your talent to a nationwide audience
https://www.talenthouse.com/i/indiamobilefilm-2016
IMFF Categories:

  1. Short Films (5-10mins)
  2. Micro Films (2-5 Mins)
  3. Nano Films (up to 2 mins)
  4. My First Shot (Any interesting, quirky or impactful moments captured candidly on mobile).
  5. International Films (upto 10 mins)

Matheran Green Festival

Nestled atop Western Ghats, the pretty hill station of Matheran is all set to get prettier. Come May 13 and the forest would echo of music and laughter.

A bunch of nature lovers from all over the globe are gearing up for Matheran Green Festival. There would be workshops, music and other performances, movie screenings, flea markets, food, riot of colors, fun and frolic all around. The twenty days festival would see Artists, Designers, Architects, Engineers, Scientists, Activists and Environmentalists come together and share their knowledge and experience, celebrate nature and spread love and awareness about sustainable living. The dump yard which is rapidly filling up with plastics, rotten smells and swarm of fleas will be transformed into a sculpture park; sculptures being made from recycled/ up cycled waste in a way that would gradually blend with nature. The countdown to the festival saw a kick starter last weekend as artists from different parts of the country came together and made graffiti on a wall near the station. The enthusiastic team also got admiration from the passing tourists at the sunset point as they made an art installation from recycled bottles and branches collected from the forest. Less than two months away, the team is working passionately all for the love of nature. As they say a journey of thousand miles begin from a single step, the dreamers for a greener universe have set their sail.

MATHERAN GREEN FESTIVAL

An event by Matheran Pratishtan
co-organised by Konkan Bhumi Pratisthan
Supported by Matheran H.S. Muncipal Council

Co-ordinated by
The New Bombay Design &
Infiniti

गल्ली…..

Vartul By Santosh Ram

Vartul Film Poster

“वर्तुळ “या माझ्या  लघुपटाने १३ पारितोषिके मिळवून  आणि ५४ अंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवात भाग घेऊन आमच्या प्रयत्नांच खरच वर्तुळ पूर्ण केल होत .वर्तुळ मुळे वयक्तिक जीवनात फार बदल झाले होते , पण आर्थिक बदल मात्र काहीच होत नव्हते  . मग काही वर्षे आर्थिक गणितांसाठी आटापिटा .. वेळ जात होता आणि पुर्ण लांबीचा चित्रपट बनवण्यासाठी  कोनीही  निर्माता पुढे येत   नव्हता . कुठलाही विचार न करता सतत प्रयत्न करत राहणे हाच एकमेव मार्ग होता त्याच बरोबर दर वर्षी एकतरी लघुपट करण्याचा आणि परत न फिरण्याचा  मी ठाम  निर्णय घेतला . एक लेखक  व  दिग्दर्शक म्हणून माझ्या अनुभवात  वाढ  आणि माझ्या क्षेत्रात   नवनवीन प्रयोग करण्यावर मी  भर दिला त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे ” गल्ली ”

खुप विषय सुचले आणि प्रत्येक वेळेला वाटल कि फिल्म करावी पण म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही . एक दिवस असच कोल्हापुरात भटकत असताना गल्लीची   कल्पना डोक्यात आली  आणि जवळ जवळ दोन वर्षे या विषयवार मी काम करत होतो .  कल्पना खरच भन्नाट होती पण १८ ते २०  मिनिटात एका गल्लीत  ७ दिवसात घडणाऱ्या सामाजिक घटना व त्याच बरोबर त्या गल्लीत राहणाऱ्या लोकांच्या घरात घडणाऱ्या घटना मला मांडायच्या होत्या . समकालीन किंवा आधुनिक जीवनात  एकत्र  कुटुंब पध्दती  जवळ जवळ संपलीच आहे आणि आजही काही भागात एक गाव किंवा एक गल्ली आपल्या परिसरालाच एक कुटुंब म्हणुन आधुनिक बदलाला सामोरे जाताना दिसतात  . विषय मोठा आणि मला भरपुर काही सांगायच होत मग मी नवीन नवीन चित्र रुपात  सांगण्याच्या  किंवा  दाखवण्याच्या पद्धती शोधु लागलो  . खुप  दिवसांपासून माझ्या डोक्यात एकही डायलॉग नसलेला लघुपट करण्याची कल्पना घर करत होती  पण ती इथे वापरता येत नव्हती . गल्लीतल्या गोष्टीचा व्याप मोठा आहे म्हणून थोडेसे   संवाद आणि थोडासा गल्लीतील  चौकातल्या फलकाचा  समर्पक वापर केला .

गल्लीत  घडणाऱ्या  सात दिवसांमधून  आपण जातो.प्रत्येक दिवसासाठी ‘एक’ सूचना वा माहिती गल्लीतल्या त्या फलकावर लिहिलेली आपण पाहतो. त्यानंतर त्याच दिवसातली गल्लीतील एखादया घरातील चार भिंतींच्या आड घडणारी घटनाही आपण पाहतो. म्हणजे जेंव्हा फलकावर ‘वाढदिवस’आहे,तेंव्हा तिकडे कुणीतरी नवीन नात्याची सुरुवात करतय;जेंव्हा फलकावर एका मुलीचे अभिनंदन आहे तेंव्हा तिकडे दुसरया मुलीची धडाडी आहे. एका वेळी फलकावर रात्रीचे भजनाचे आमंत्रण असते तेंव्हा छोट्या घरात एका म्हतारया आजोबांची जीवन जगण्याची इच्छाच संपली आहे  .जन्म ,आशा, निराशा,जिदद,वाढत्या वयानुसार बदललेली नाती, सर्वकाही गमावून बसलेल्यांची जगण्याची धडपड ,तसेच मृत्यु इत्यादी सर्व मानवी भावनांनि भरलेली हि गल्ली आहे ,जी इतर सर्व ठिकाणीही असते पण आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात त्यांच्याकडे नीटसे पाहू शकत नाही .

विवेक चित्र निर्मित  “गल्ली” चे छायाचित्रीकरण बेंजामिन बृगत्झ या बेल्जीयम येथील छायाचित्रकाराने केले असून  विवेकानंद डाखोरे यांनी  संकलन केले आहे  . प्रणव घोड नदिकर याचे संगीत आहे  तर समीर थोरात यांनी  ध्वनी मुद्रणाची  धुरा सांभाळलि आहे .  निर्माता रामचंद्र पुंडलिकराव मरेवांड  आणि कार्यकारी निर्माता म्हणुन बालाजी रामचंद्र मरेवाड  आहेत  .गल्ली  ह्या लघुपटाच्या माध्यमातून आता अस्तित्वात असल्रली व  पुढे हळु हळु  लुप्त पावत जाणारी  हि गल्ली हा मानवी वसाहतीचा प्रकार एका अर्थाने पुढील पिढ्यांच्या माहितीकरिता नमूद झाला आहे .  गल्ली आज  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी तयार आहे  आणि मला  खात्री आहे कि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गल्ली नक्कीच आपला ठसा उमटवेल .

(लेखक ‘वर्तुळ ‘आणि ‘गल्ली ‘या लघुपटांचे  दिग्दर्शक आहेत )

www.marathilaghupat.com

 

‘माय मुंबई लघुपट मोहत्सव’ उत्साहात साजरा